Theft: दोघांना हत्याराचा धाक दाखवून दीड लाख रूपयांची रक्कम लुटली
अहमदनगर|Ahmedagar | Theft: कोपरगावहून अहमदनगर शहराकडे येणार्या दोघांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील दीड लाख रूपयांची रक्कम लुटल्याची घटना नागापूर एमआयडीसी परिसरातील साईबनजवळ ही घटना घडली. बुधवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चार चोरट्यानविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा (Theft Crime ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राहुल संतोष कदम (रा. टीव्ही सेंटर, तोफखाना) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बुधवारी रात्री त्यांचे साथीदार कृष्णा गोरे यांच्यासह पिकअप वाहनातून कोपरगावहून अहमदनगर शहराकडे येत होते. रात्री पावणे बाराच्या सुमारास अहमदनगर-मनमाड महामार्गावरील विळद बायपासच्यापुढे साईबनजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी कदम व गोरे यांना अडविले. चोरट्यांनी त्यांच्याकडील हत्याराचा धाक दाखवून पिकअपमधील खोक्यात ठेवलेली दीड लाख रूपयांची रक्कम काढून घेतली. कदम यांच्या डोक्यात जेवणाचा डब्बा मारल्याने ते जखमी झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहे.
Web Title: Theft two were robbed of Rs 1.5 lakh in fear of a killer