Theft: एसटी बसमध्ये प्रवासा दरम्यान शिक्षक महिलेचे 1 लाख 70 हजार रुपयांचे दागिने लंपास
राहुरी | Rahuri: एसटी बसमध्ये नगर-राहुरी प्रवासा दरम्यान एका शिक्षक महिलेचे 1 लाख 70 हजार रुपयांचे सुमारे 6 तोळे वजनाचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून (Theft) नेल्याची घटना दि. 10 मे रोजी घडली.
सौ. शारदा सुनील कुलांगे, वय 43 वर्षे, रा. मिरजगाव, ता. कर्जत ही महिला शिक्षिका आहे. दि. 10 मे रोजी दुपारी सव्वा वाजे दरम्यान सौ. शारदा कुलांगे व त्यांची मुलगी अहमदनगर येथील तारकपूर बसस्थानकातून एसटी बस (क्रमांक एमएच 14 बीटी 3594) या बसमध्ये बसल्या होत्या. सव्वादोन वाजे दरम्यान ती बस राहुरी बसस्थानकात आली. सौ.कुलांगे यांनी दागिने त्यांच्याजवळ असलेल्या कपड्यांच्या बॅगमध्ये ठेवले होते.
तारकपूर ते राहुरी या प्रवासा दरम्यान सौ. कुलांगे यांच्या बॅगेतील 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे 700 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या तसेच 60 हजार रुपये किंमतीचे 2 तोळे वजनाचे मिनी गंठण असा एकूण 5 तोळे 700 ग्रॅम वजनाचे 1 लाख 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात भामट्याने चोरून नेले. एसटी बस राहुरी बसस्थानकात आल्यावर सौ. कुलांगे यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत.
Web Title: Theft Rs 1 lakh 70 thousand belonging to a female teacher during a journey