Sangamner: संगमनेर तालुक्यात कांद्याचे रोपाची रात्रीतून चोरी
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील कान्होरे मळा(घारगाव) येथील आनंदा बाबुराव औटी यांच्या मालकीच्या शेतातील लागवडीस आलेले कांदा रोप अज्ञात व्यक्तींनी शनिवारी पहाटे चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कान्होरे मळा(घारगाव) येथील आनंदा बाबुराव औटी यांचे शेत आहे. या शेतात त्यांनी साडे आठ किलो कांद्याचे रोप टाकले होते. हे रोप लागवडी योग्य झाल्याने शेत तयार करून शुक्रवारी लागवड सुरु केली होती.
शनिवारी पहाटेच्या सुमारास एक ते दीड किलोच्या बियाणांचे रोप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या रोपाची बाजारात किंमत मजुरी, औषधे बियाणेसह बारा ते तेरा हजार रुपये इतके आहे. या शेतकऱ्याचे बारा ते तेरा हजाराचे नुकसान झाले त्याचबरोबर घरी असलेल्या लागवडीच्या शेतात आता कमतरता भासणार आहे. रात्रीच्या वेळी चोरटे रोप उपटून नेत असल्याने शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली आहे.
Web Title: Theft of onion seedlings in Sangamner taluka