Home अहमदनगर Theft: ट्रक चालकाला मारहाण करून लुटले

Theft: ट्रक चालकाला मारहाण करून लुटले

Theft News truck driver was beaten and robbed

राहता | Theft | साकुरी: शिर्डी शहरालगत असलेल्या नगर मनमाड रोडवरील हॉटेल संस्कृती जवळ दिनांक १७ डिसेंबर रोजी ट्रक घेऊन जात असताना चालक लघुशंकेसाठी उतरला असता त्याला व किन्नरला अज्ञात चार चोरट्यांनी मारहाण केली तसेच चालकाच्या खिशात असलेले दोन हजार व डिकीतील ५५ हजार व ३ हजाराचे मोबाईल असा ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार अशोक जगन्नाथ देवकाते वय २८ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी यांनी दिली आहे.

या घटनेत चोरट्यांनी वाहन देखील पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने या वाहनाला जीपीएस सुविधा असल्याचे सांगत चोरट्यांनी मोबाईल घेऊन पोबारा केला. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे. या घटनेने वाहनधाराकामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.  

Web Title: Theft News truck driver was beaten and robbed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here