Home अहमदनगर श्रीगोंद्यात मध्यरात्री चोरी, कोरोना निर्बंधाचा फटका  

श्रीगोंद्यात मध्यरात्री चोरी, कोरोना निर्बंधाचा फटका  

Theft in Shrigonda at mid night

श्रीगोंदा | Theft: श्रीगोंदा पारगाव रोडवरील बोरुडे मळा येथे शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. राजेंद्र पांडुरंग बोरुडे यांच्या घराचे कुलूप तोडून मोठा ऐवज लंपास केला आहे. या घटनेत चोरट्यांनी किती लाखाचे सोने व रक्कम चोरीस गेली हे अद्याप कळलेले नाही.

चोरी झाल्याचे कळताच पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासास सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळी श्वान पथक, ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले.

कोरोना निर्बंध सुरु असल्याने श्रीगोंदा तालुक्यात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. राजेंद्र बोरुडे यांची चोरी परिसरात जवळपास राहणाऱ्या भुरट्या चोरट्यांनी केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे चोरीचे सत्र सुरूच आहे. काहीना काही काम धंदा उरला नाही, रोजगार नाही. आर्थिक टंचाई यामुळे तरुणाई वर्ग गैरमार्गाचा वापर करीत असून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.

Web Title: Theft in Shrigonda at mid night

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here