संगमनेरात घरफोडी करून लुटला ५५ हजारांचा ऐवज
Sangamner Theft: बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १० हजार रुपयांचे सोने व ५५ हजार रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर शहरानजीक – असलेल्या घुलेवाडी शिवारातील मालपाणी नगर परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १० हजार रुपयांचे सोने व ५५ हजार रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
याबाबत येथील शहर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, देवा मोहन भगत हे आपल्या कुटुंबासोबत संगमनेर शहरानजीक असलेल्या घुलेवाडी शिवारातील मालपाणी नगर येथील अम. सिया अपार्टमेंटमध्ये राहतात.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
रविवारी (दि. २५ ) डिसेंबर सकाळी ११ ते सोमवारी (दि. २६) डिसेंबर पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून बेडरूम मधील कपाटाचे लॉकर कशाने तरी उघडुन त्यात असलेले १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मनी मंगळसुत्र व चांदीची वाटी तसेच ५५ हजारांची रोख रक्कम चोरुन नेली. असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे. याप्रकरणी देवा भगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आरवडे करीत आहेत.
Web Title: Theft from a house in Sangamner
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App