अहमदनगर धक्कादायक: पोलीस ठाण्यातील डिझेल चोरताना पोलिसालाच रंगेहाथ पकडले
Pathardi Theft | पाथर्डी: पोलीस ठाण्याच्या आवारात बनावट डिझेल चोरीचे दोन टँकर उभे आहेत त्यातूनच चोरी करताना एका पोलीस कर्मचाऱ्यासह चौघांवर बायोडिझेल चोरीचा कॅ सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलीस नाईक ईश्वर गर्जे यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री ठाणे अंमलदार कर्तव्यावर हजर असताना यातील आरोपी भागवत काशिनाथ चेमटे रा. शिंगोरी, असिफ रफिक शेख रा. पाथर्डी, दीपक आरोळे, विष्णू बाबासाहेब ढाकणे रा. तकली मानूर, पोलीस नाईक दीपक अशोक शेंडे यांनी कट रचून संगनमत करून दाखल गुन्ह्यातील टँकर मधील ३ लाख रुपये किमतीचे ५०० लिटर बायोडिझेल इंधन इंजिन व पाईपच्या सहायाने पांढऱ्या रंगाचा टँकर क्रमान एम.एक. १४ ए.एच.६४६८ मध्ये चोरी करून आरोपी विष्णू ढाकणे याच्या पेट्रोल पंपावर बेकायदेशीरपणे विकण्याच्या उद्देशाने चोरी करत असताना मिळून आले. या चोरीच्या कटात पोलीस नाईक दीपक शेंडे (नेमणूक पाथर्डी पोलीस स्टेशन) यांनी मदत केली. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Theft diesel from the police station, the police caught him red-handed