Home संगमनेर संगमनेर तालुक्यात चोरट्यांनी कापड दुकान फोडले

संगमनेर तालुक्यात चोरट्यांनी कापड दुकान फोडले

Sangamner Theft:  अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गुरुदत्त कलेक्शन कापड दुकान फोडल्याची घटना.

Theft broke into a cloth shop in Sangamner taluka

संगमनेर: तालुक्यातील साकुर येथील चौफुलीवरील संगमनेर रोडलगत असलेल्या बिरेवाडी येथील विनायक देवराम ढेंबरे यांचे गुरुदत्त कलेक्शन कापड दूकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना शनिवार दि. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  साकुर जवळील बिरेवाडी येथील विनायक देवराम ढेंबरे हे रहिवासी आहे. त्यांचे साकुर चौफूलीवर संगमनेर रोडलगत गुरुदत्त कलेक्शन कापड दूकान आहे. नेहमीप्रमाणे विनायक ढेंबरे शनिवारी सायंकाळी दूकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शेटरचे कुलूप तोडून दूकानात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीच्या वायरी तोडून बॉक्स लांबविला. तसेच चोरट्यांनी दुकानातील मांडण्यावरील सर्व कपड्यांची उचकापाचक करत अस्ताव्यस्त करून खाली टाकून दिले. रविवारी सकाळी विनायक ढेंबरे दूकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दूकानात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. दूकानात जाऊन बघितले तर कपडे अस्ताव्यस्त दिसले.

त्यानंतर याबाबतची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पो. कॉ बांडे, भांगरे, तळपाडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. परंतु चोरट्यांनी कपडे मोठ्या प्रमाणात चोरून नेल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नेमका किती रुपयांचा माल चोरून नेला याबाबत माहिती मिळाली नाही. परंतु मोठ्या प्रमाणात विनायक ढेंबरे यांचं नुकसान झाले आहे. याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Theft broke into a cloth shop in Sangamner taluka

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here