अहमदनगर: पोलिस ठाण्यातच – उपसरपंचाला मारहाण
Ahmednagar | Pathardi News: दारू विकू नको, असे सांगितल्याचा राग मनात धरून उप सरपंचाला मारहाण केल्याची घटना.
पाथर्डी: दारू विकू नको, असे सांगितल्याचा राग मनात धरून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सोमठाणे नलवडे येथील उपसरपंच आकाश रामभाऊ दौंडे हे पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात चालले होते. त्याचवेळी पाच-सहा तरुणांनी त्यांना पोलिस ठाण्याच्या दारातच मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
याबाबत पोलिस नाईक दत्तात्रय बडधे यांच्या फिर्यादीवरून पाच तरुणांसह दोन अनोळखी तरुणांवर सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पाच तरुणांना ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी सकाळी तालुक्यातील सोमठाणे नलवडे या गावचे उपसरपंच आकाश रामभाऊ दौंडे यांना योगेश मधुकर दौंडे यांनी मारहाण केल्याची घटना घडली. सोमठाणे नलवडे गावात ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव झाला होता. उपसरपंच आकाश दौंडे यांनी योगेश दौंडे यास दारू विकू नको, असे – सांगितले. त्याचा राग धरून त्याने मारहाण केली, असे आकाश दौंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे
फिर्याद दिल्यानंतर आकाश दौंडे हे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी चालले होते. पोलिस ठाण्याच्या आवारातच आकाश दौंडे व योगेश दौंडे, सतीश दौंडे, संतोष दौंडे, मनोज तुपविहिरे व दोन अनोळखी यांच्यामध्ये मारहाण सुरू असल्याचा प्रकार कार्यालयात बसलेले पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर, प्रदीप राजगुरू, पोलिस कर्मचारी कृष्ण बडे, भगवान सानप, अनिल बडे आदींनी पाहिला. त्यांनी पाच तरुणांना ताब्यात घेतले तर अनोळखी दोघे तरुण पळून गेले. यासंदर्भात पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ केल्याने गुन्हा दाखल केला असून आरोपींमध्ये उपसरपंच आकाश दौंडे यांचाही समावेश केला आहे. पोलिस ठाण्याच्या आवारात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे मारहाणीचा सर्व प्रकार त्यामध्ये कैद झालेला आहे.
Web Title: the police station itself – the beating of the deputy sarpanch
महत्वाचे:
आपला App अपडेट करा प्ले स्टोर ला जाऊन लिंक: पुढीलप्रमाणे अपडेट लिंक
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App