Home अकोले अकोलेतील दारू प्रश्न पुन्हा ऐरणीवर

अकोलेतील दारू प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Breaking News | Akole: तालुक्यातून अवैध दारू हद्दपार होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी १५ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिला.

The liquor issue in Akole is back on the agenda

अकोले:  अकोले तालुक्यातून अवैध दारू हद्दपार होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी १५ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. अकोले आणि राजूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील २५-३० गावांमध्ये राजरोसपणे अवैध दारूविक्री सुरू आहे.

संगमनेर, शेंडी, ठाणगाववरून दारूची वाहतूक होते आणि वीरगाव फाटा, इंदोरी फाट्यावरून ती पाठवली जाते. संगमनेरमधून येणारी दारू उत्पादन शुल्क विभाग का थांबवत नाही, असा प्रश्न कुलकर्णी यांनी विचारला आहे आणि यामागे काही संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी अकोल्यातील गुटखा प्रकरणात पैसे गोळा केल्याच्या चौकशीचीही मागणी केली आहे. तहसीलदारांनी या तक्रारी गंभीर मानून आठ दिवसांत दारूविक्री थांबवण्याचे आणि संगमनेरहून येणारी दारू रोखण्याचे आदेश दिले आहेत. राजूर हे दारूबंदी असलेले गाव असूनही तिथे दारूविक्री सुरू असून शेंडीतूनही खुलेआम दारू येते, पण पोलीस निरीक्षक काहीच करत नाहीत, अशी तक्रार हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे. राजूरच्या दारूबाबत पोलीस अधीक्षकांकडे स्वतंत्र तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Breaking News: The liquor issue in Akole is back on the agenda

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here