Home अकोले कै. सावित्रीबाई मदन स्मृतीचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

कै. सावित्रीबाई मदन स्मृतीचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

Rajur News: The inter-school taluka level marathon competition concluded with great enthusiasm.

The inter-school taluka level marathon competition concluded with great enthusiasm

राजूर: येथील सत्यनिकेतन संस्थेने सन 2023-24 कै. सावित्रीबाई मदन स्मृतीचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात होती. सदर स्पर्धा सत्यानिकेतन संस्थेचे सचिव टी. एन. कानवडे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला.

कै. सावित्रीबाई  मदन स्मृतीचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरी मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेच्या स्वागत समारंभासाठी राजुर पोलीस स्टेशनचे पीआय सन्माननीय प्रविण दातरे उपस्थिती होते.  यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सत्यनिकेतन संस्थेचे संचालक सन्माननीय अशोक मिस्त्री यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक केले.

या स्पर्धेत मुलांमध्ये लिंगदेव येथील  भोजने वैष्णव सखाराम या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला तर मुलींमध्ये पाडोशी येथील नाडेकर प्रतीक्षा आनंदा या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला.  

या स्पर्धेमध्ये  खालील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी यश संपादन केले

मूले:-

1) भोजने वैष्णव सखाराम- लिंगदेव

2 ) भांगरे समीर विष्णू- मवेशी

3) डगळे मंथन तुकाराम -सर्वोदय खिरविरे

4) पोटे ओंकार पंढरीनाथ-सर्वोदय खिरविरे

5) धादवड ओंकार विलास -सर्वोदय राजूर

मूली:-

१)नाडेकर प्रतीक्षा आनंदा -पाडोशी

2 )आवारी पूजा भाऊसाहेब-सर्वोदय  खिरविरे

3 )दिघे आरती मारुती-सर्वोदय राजुर

4 )जाधव श्रेया सतीश- लिंगदेव

5 )साबळे जयश्री कैलास- पाडोशी

या स्पर्धेनंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या समारंभासाठी  मा. मनोजकुमार पैठणकर (सहाय्यक प्रकल्प अधिकारी , शिक्षण विभाग ) व मा. करवर साहेब,  सत्यनिकेतन संस्थेचे संचालक सन्माननीय अशोक मिस्त्री व विजय पवार सर, सत्यनिकेतन संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश महाले, उप प्राचार्य अण्णासाहेब धतुरे, माजी प्राचार्य लहानू पर्बत, कातळापूर मुख्याध्यापक बादशाह ताजणे, पर्यवेक्षक एस.आर. गिरी उपस्थिती होते.

यावेळी मा. मनोजकुमार पैठणकर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहून मैदानी खेळात सहभाग नोंदविण्याचे, पुस्तक वाचनाचे आवाहन केले.

पहा व्हिडियो:

या स्पर्धेचे संयोजन सर्वोदय विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर, जालिंदर आरोटे, विनोद तारू, संपतराव धुमाळ यांनी केले. तसेच सदर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सत्यनिकेतन संस्थेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी सर्व विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक,  शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व  वसतीगृह कर्मचारी व सत्यनिकेतन परिवार यांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: The inter-school taluka level marathon competition concluded with great enthusiasm

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here