अकोले ब्रेकिंग: फोफसडी येथे पाण्यात बुडालेल्या त्या दोन पर्यटकांचे मृतदेह सापडले
Akole news: फोफसंडी येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना. (dead bodies Found).
अकोले: तालुक्यातील फोफसंडी येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी घडली होती.
रात्री उशिरा पर्यंत शोधूनही त्यांचा शोध न लागल्याने आज शनिवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले आपत्ती व्यवस्थापन ची टीम , राजूर पोलीस स्टेशन तसेच पोहन्यात तरबेज असणाऱ्या दोघा व्यक्तींच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या दोघा तरुणाचा मृतदेह डोहातील कपारीतून बाहेर काढण्यात आला.
अभिजित वरपे व पंकज पलांडे असे या मृत तरुणांचे नाव आहे ते संगमनेर तालुक्यातील कनोली येथील रहिवाशी आहे उत्तरीय तपासणीं साठी दोन्हीं मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले
संगमनेर येथील अभिजित वर्षे, पंकज पाळंदे, सिध्दांत वाबळे व सिद्धार्थ वाबळे हे चार तरूण दोन दुचाकीवरून फोपसंडी येथे फुलोत्सव पाहण्यासाठी गेले होते. हे तरूण महाविद्यालयीन असल्याचे समजते. पैकी अभिजित वर्पे व पंकज पाळंदे दुपारी साडेतीनच्या सुमारास गावाच्या पश्चिमेला असलेल्या पाणवठ्याच्या ओढयात पाण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले मात्र या ठिकाणी खोल गर्ता असल्याने ते बुडू लागले. ते पाहून बरोबर असलेल्या दोन मित्रांनी आरडाओरडा करत गाव गाठले. गावातील लोक जमा झाले. सिध्दांत व सिद्धार्थ वाबळे पुर्ण भेदरलेल्या अवस्थेत असल्याने गावकऱ्यांनी धीर देत शोधकार्य सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अंधार पडल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. तरीही ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने शोध मोहिम सुरू ठेवली.
पर्यटकांनी भंडारदरा- फोफसंडी परिसरात पर्यटनाला येताना स्थानिक गाईड अथवा ग्रामस्थांकडून माहिती घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अहमदनगर मोठी बातमी: गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल, Gautami Patil
पर्यटकांनो सावधान… सध्या पावसाळा सुरू असल्याने सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून जंगल, धबधबे, फुलोत्सव, हिरवळ असे अनेक आकर्षक फोटो व्ह शेअर होतात. त्यातून पर्यटक येथे जाण्यासाठी आकर्षित होतात. सध्या फोपसंडी येथे जाण्यासाठी रस्ता अत्यंत खराब आहे. तसेच जंगलात फिरताना सरपटणारे प्राणी, कडे, आणि दरडी कोसळणे हे प्रकार जास्त असल्याने वन्यजीव अधिकारी यांच्या परवानगीनेच जंगलात जावे.
Web Title: The dead bodies of the two tourists who drowned in the water were found at Phopsandi
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App