द बर्निंग ट्रक थरार, ट्रकला आग
श्रीगोंदा | Accident: श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेलवंडी फाटा शिवारात पहाटेच्या सुमारास राजस्थानवरून बारामतीकडे फरशी घेऊन चाललेल्या ट्रकने पाठीमागील बाजूने अचानक पेट घेतला. यावेळी जवळच्या वस्तीवरील नागरिकांनी बेलवंडी पोलिसांना तत्काळ खबर दिल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रक विझाविल्याने मोठी जीवितहानी व नुकसान टाळले.
राजस्थानवरून बारामतीकडे फरशी घेऊन चाललेला (एम.पी.३३ एच. २३०६) शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बेलवंडी फाटा शिवारात आल्यानंतर ट्रकने अचानक पेट्य घेतला. यावेळी ट्रकमध्ये असणारे चालक पवन गुजर, सह चालक रणजीतपाल हे गाडीतून उतरल्याने सुखरूप बचाविले. बेलवंडी पोलिसांनी अग्निशमन दल पाचारण केले व स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे शेजारीच असलेल्या वनविभागाचे जंगल बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळे यांनी सांगितले.
महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला अॅप येथून अपडेट करा. संगमनेर अकोले न्यूज
Web Title: The burning truck Accident