Home अहमदनगर ठाकरे-थोरातांचा वंचितवर निशाणा

ठाकरे-थोरातांचा वंचितवर निशाणा

Ahmednagar Lok sabha Election 2024:  शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदारांनी वंचितला मते देऊन ती वाया घालवू नयेत.

Thackeray-Thorat targeting the underprivileged

श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदारांनी वंचितला मते देऊन ती वाया घालवू नयेत, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. वंचितला मत हे एकप्रकारे बाद ठरेल, असे दोघा नेत्यांनी सांगितले.

तिरंगी लढतीमध्ये वंचितच्या मतांकडे महाआघाडीने विशेष लक्ष दिल्याचे यानिमित्ताने दिसत आहे. येथील थत्ते मैदानावर गुरुवारी रात्री आयोजित सभेत ठाकरे व थोरात बोलत होते. मतदानाला आता अवघे चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे महाआघाडीच्या वतीने वाकचौरेंच्या प्रचारार्थ ही शेवटचीच मोठी सभा घेण्यात आली. वंचित आघाडीला मतदान करू नये, असे दोघाही नेत्यांनी यावेळी जाहीर केले. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यावर मात्र ठाकरे व थोरात यांनी मोठी टीका करण्याचे टाळले. लोखंडे यांनी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना येथून पराभूत करण्याचा इरादा ठाकरे यांनी बोलून दाखविला.

ठाकरे यांनी वंचितचे नाव न घेता निवडणूक रिंगणात अन्य उमेदवार उभे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ही निवडणूक संविधान वाचविण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणीही भाजपला मदत करण्याचे पाप करू नये. सर्व समाजाला माझे आवाहन आहे की त्यांनी मतांची विभागणी होऊ देऊ नये. महाआघाडीच्या उमेदवारांना मदत करुन मतदानाद्वारे संविधानाचे रक्षण करावे. विरोधकांची मते नासावायची हा भाजपचा डाव आहे. मात्र हुकुमशाहीविरुद्धची मते नासवायची नाहीत, हे मतदारांनी निश्चित करावे. हुकूमशाहीविरुद्ध संपूर्ण देश पेटून उठला आहे.

Web Title: Thackeray-Thorat targeting the underprivileged

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here