Home पुणे Accident: एसटीचा ब्रेक फेल झाल्यामुळे भीषण अपघात, पाच ते सहा गाड्यांना धडक

Accident: एसटीचा ब्रेक फेल झाल्यामुळे भीषण अपघात, पाच ते सहा गाड्यांना धडक

Terrible accident due to brake failure of ST

पुणे | Pune: पुण्यात सातारा रोडवर एसटीचा ब्रेक फेल झाल्यामुळे 5 ते 6 गाड्यांना उडविल्याची घटना घडली आहे. तसेच एका कारलाही धडक दिली. या अपघातात (Accident) तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पुण्यातील सातारा रस्त्यावर हॉटेल रविकांत जवळ हा झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अचानक एसटीचा ब्रेक फेल झाल्यामुळे एसटीने पाच ते सात गाड्यांना धडक दिली, या अपघातात तिघेजण जखमी झाले. जखमींना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातमुळे सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी वाहतुक पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. त्यामुळे एसटी बस बंद अवस्थेत होत्या. बस आता पुन्हा सुरु झाल्या आहेत.

Web Title: Terrible accident due to brake failure of ST

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here