वर्षाच्या अखेरचे दोन दिवस कळसुबाई गडावरील टेंट कॅपींग व ट्रैकिंग बंद
Akole News: ३० व ३१ डिसेंबर रोजी कळसुबाई गडावरील प्रवेश बंद.
बारी : महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर असलेल्या प्रख्यात असे कळसुबाई शिखर हे बारी गावाचे नाव महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानावर आहे. येथे लांब लांबचे पर्यटक आवर्जून पाहण्यासाठी येतात त्यामुळे या भागात स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाली आहे परंतु त्यामुळे काही प्रमाणात मिळालेल्या संधीचा दूरपयोग होत आहेत. सदर परिसरात दारूच्या बाटल्या व व्यसनाचे साहित्य आढळून आले आहे. कळसुबाई अभय आरण्य क्षेत्रात कळसुबाई शिखर परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा अतिप्रमाणात रात्रीच्या वेळी गावातून गडावर जात असताना अति आरडा-ओरड होत असून मध्यरात्री गावातील रहिवाश्यांना याचा त्रास होत असल्याने व गडावरील उंचसखल भागात विहिरीच्या अजुबाजूस टेंट कैपींग लाऊन मद्यपान करतात तसेच अल्लील गोष्टी करतात.
अदिवासी समाजाचे कुलदैवत असून गडावर अतिप्रमाणात टेंट कॅपींग करून मद्यपान करून नशेच्या भरात असल्यामुळे त्रासदायक वातावरण तयार होत आहे. याच गोष्टीचा संदर्भ घेत येणाऱ्या ३० व ३१ डिसेंबर रोजी आम्ही अखिल भारतीय विकास परिषद चे सर्व पदाधिकारी व गावकरी बांधव मिळून गडावरील प्रवेश बंद करत आहोत व निषेध आंदोलन करणार आहोत. कळसुबाई गड माची सकाळी ठीक १०.०० वा दि.३१/१२/२०२३ रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.
तसेच ३१ डिसेंबर या दिवशी कळसुबाई गडावर पर्यटक मद्यपान करताना आढळल्यास त्याला व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येयील याची आपण तातडीने नोंद घ्यावी. तसेच आम्ही या निवेदनाद्वारे आपणास मागणी करतो की दि.३१/१२/२०२३ या दिवशी सकाळी ठीक १०.०० वा कळसुबाई माची या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार असून याची पोलीस प्रशासनाणे गांभीर्य पूर्वक नोंद घ्यावी. येत्या ३० व ३१ डिसेंबर रोजी चोख बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी आम्ही अखिल भारतीय विकास परिषदेचे पदाधिकारी यांनी राजूर पोलीस स्टेशनाला निवेदन दिले आहे.
Web Title: Tent capping and tracking off Kalsubai fort for the last two days of the year
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App