Home पुणे टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग, चार कर्मचाऱ्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू

टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग, चार कर्मचाऱ्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू

Breaking News | Fire: हिंजवडीतील एका कंपनीच्या कर्मचार्याना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याने भीषण अपघातात चार कर्मचाऱ्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाल्याची घटना.

Tempo Travels catches fire, four employees die in car

Pimpari: हिंजवडीतील एका कंपनीच्या कर्मचार्याना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याने भीषण अपघातात चार कर्मचाऱ्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काहींनी उद्या मारत आपला जीव वाचवला आहे. सहा जण गंभीर भाजले आहे.

पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

टेम्पो जळून खाक झाला आहे, तर टेम्पोमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चौघे ही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते.

त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्यानंतर आयटीयन्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आयटी हब हिंजवडीत शेकडो कंपन्यांमध्ये आयटीयन्स, बॅक ऑफिस, सुरक्षा रक्षक यांसह रोज पाच लाख कर्मचाऱ्यांची ये जा होत असते.

यातील ऐंशी टक्के कर्मचारी अशा खाजगी वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करतात, त्या सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. त्याअनुषंगाने नवी नियमावली राबविण्याचा आता विचार केला जाणार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Tempo Travels catches fire, four employees die in car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here