Home अहमदनगर अहमदनगर: टेम्पोने तब्बल ८ किमी फरफटत नेली दुचाकी, एकाचा मृत्यू

अहमदनगर: टेम्पोने तब्बल ८ किमी फरफटत नेली दुचाकी, एकाचा मृत्यू

Ahmednagar News: दुचाकी-टेम्पोचा अपघात (Accident) झाला. त्यानंतर चालकाने टेम्पो न थांबविता दुचाकीसह तो तसाच पुढे पळविला. जागीच मृ.त्यू झालेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह तेथेच बाजूला पडून होता.

tempo took the bike for 8 km, killing one Accident

श्रीगोंदा:  ढोकराई फाटा (ता. श्रीगोंदा) येथे मंगळवारी सायंकाळी दुचाकी-टेम्पोचा अपघात झाला. त्यानंतर चालकाने टेम्पो न थांबविता दुचाकीसह तो तसाच पुढे पळविला. जागीच मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह तेथेच बाजूला पडून होता. मात्र टेम्पोचालकाने दुचाकी थेट आठ किमीवरील लोणी व्यंकनाथपर्यंत ओढत नेली. तेथे ग्रामस्थांनी टेम्पो थांबवून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

अनिल गुलाब साळवे (वय ५०, रा. राहिंजवाडी, ता. श्रीगोंदा) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अनिल साळवे हे दुचाकीवरून दळण आणण्यासाठी नगर-दौंड रस्त्यावरून ढोकराई येथे जात होते. त्यावेळी नगरच्या दिशेने चाललेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात साळवे यांचा मृत्यू झाला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बाजूला पडला. अपघातानंतर टेम्पोच्या पुढच्या भंपरमध्ये दुचाकी अडकली होती. चालकाने टेम्पो न थांबविता तो वाजेच्या तसा पुढे नेला. थेट लोणी व्यंकनाथपर्यंत टेम्पोचालकाने दुचाकी ओढत नेली. लोणी येथे टेम्पोचालकाने एका बोलेरोलाही धडक दिली. गावकऱ्यांनी टेम्पो अडविला. चालकाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक फौजदार विठ्ठल बडे यांनी लोणी व्यंकनाथ येथे टेम्पोच्या चालकाला ताब्यात घेतले. दुसरी घटना मंगळवारीच सायंकाळी साडेसहा सुमारास नगर-दौंड रस्त्यावरील निमगाव खलू येथे घडली. उरुळी कांचन (जि. पुणे) येथील रहिवासी असणारे तानाजी ज्ञानदेव शिंदे (वय ३२, रा. उरुळी कांचन, पुणे) नातेवाइकांना भेटण्यासाठी जात होते. त्यांच्या दुचाकीला निमगाव खलूनजीक अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: tempo took the bike for 8 km, killing one Accident

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here