मालकाला पैसे न देता पसार झालेला टेम्पो चालक राजुरमध्ये जेरबंद
Ahmednagar News: अल्युमिनियमच्या पट्ट्या उतरवून तीन लाख रुपये घेऊन पळालेल्या टेम्पोचालकास स्थानिक गुन्हे शाखेने अकोले तालुक्यातील राजूर येथे सापळा रचून जेरबंद.
अहमदनगर : अल्युमिनियमच्या पट्ट्या उतरवून तीन लाख रुपये घेऊन पळालेल्या टेम्पोचालकास स्थानिक गुन्हे शाखेने अकोले तालुक्यातील राजूर येथे सापळा रचून जेरबंद केले असून त्याच्याकडून तीन लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
प्रतीक यशुदास कळकुंबे (वय २५ वर्षे, रा. कानडे मळा, सारसनगर) असे अटक केलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याबाबत यशवंत सोन्याबापू धामणे (रा. कानडे मळा, सारसनगर) यांनी फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी धामणे यांचे सारसनगर येथे न्यू शनिराज ट्रेडर्स नावाचे अल्युमिनियम पट्ट्या विक्रीचे होलसेल दुकान आहे, त्यांच्या दुकानातील टेम्पोचालक कळकुंडे ऑर्डरप्रमाणे अल्युमिनियम पट्ट्या दुकानदारांना पोहोच करण्याचे काम करत असतो. मंगळवारी (दि. ३१) तो अल्युमिनियमच्या पट्ट्या घेऊन शेवगावला गेला, पट्ट्या उतरवून त्याने दुकानदाराकडून ३ लाख रुपये रोख घेतले. हे पैसे मालकाला न देता फरार झाला. याबाबत धामणे यांनी केली.भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केला.
तांत्रिक विश्लेषणात पैसे घेऊन पळालेला चालक अकोले तालुक्यातील राजूर परिसरात फिरत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने राजूर परिसरात सापळा रचला. आणि त्यात टेम्पोचा चालक अलगद अडकला. त्याच्याकडून दुकानदाराकडून घेतलेले तीन लाख हस्तगत करण्यात आले.
तसेच टेम्पो व अल्युमिनियमच्या पट्ट्या, असा एकूण २ लाख ९७ हजार हा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, त्याला पुढील तपासासाठी भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास भिंगार कॅम्प पोलिस करत आहेत. ही कारवाई सहायक फौजदार मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, तो सचिन अडबल आदींच्या पथकाने केली.
Web Title: Tempo driver caught in Rajur after fleeing without paying owner
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App