अहमदनगर: मजुरांना नेणारा टेम्पो उलटून महिलेसह दोन ठार
Breaking News | Ahmednagar: पिकअप टेम्पो शिर्डी-सिन्नर मार्गावर वावी परिसरात उलटून एका महिलेसह दोन जण ठार.
कोळपेवाडी: कोळपेवाडी येथील महिला मजुरांना घरी सोडण्यासाठी येणारा पिकअप टेम्पो शिर्डी-सिन्नर मार्गावर वावी परिसरात उलटून एका महिलेसह दोन जण ठार झाले व १९ महिलांसह २२ जण जखमी झाले. त्यात चालकाचाही समावेश असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मंदाबाई उशिरे व जगन राणू कोळपे अशी मृतांची नावे आहेत.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, मळेगाव व येवला तालुक्यातील काही मजूर महिला व पुरुष महामार्गालगतचे गवत काढण्याचे व साफसफाईसाठी कोळपेवाडीहून वावी येथे जातात. तेथून ते पिकअप टेम्पोतून पुढे कामासाठी जातात. संध्याकाळी पुन्हा त्यांना वावी येथे सोडले जाते. बुधवारी (दि. १८) या मजुरांना सोडण्यासाठी निघालेला टेम्पो (एमएच १४ डीएम १४५४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वावीजवळ गोडगे पब्लिक स्कूलसमोर उलटला. महिलांसह सर्व जण रस्त्यावर फेकले गेले. त्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
गंभीर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी एक महिला अत्यवस्थ असल्याचे समजते. अन्य गंभीर जखमी असलेल्या महिला व दोन पुरुषांना सिन्नर व नाशिक येथील
खासगी रुग्णालयात हलविले आहे. जखर्मीमध्ये सुनीता शिवदे अलका झावरे, सखुबाई माळी लताबाई मुजगुले, वैष्णवी होंडे, सुरेख होंडे, गुड्डी कोळपे, सुमनवाई राजेंड सूर्यवंशी, आदिनाथ इंगळे (मळेगाव) ऋषिकेश पिसाळ (महालखेडा) समाधान कोळपे, अनिता भुतनर, ताः सुरेश गायकवाड, शीला दत्तू कोळपे संगीता शिवदे, ललिता शिवदे हिराबाई गर्दे, यमुनाबाई कोळपे, सुरेख कोळपे यांचा समावेश आहे. यातील काही महिलांचे वय ६० पेक्षा अधिव असल्याचे समजते. दरम्यान ठेकेदाराने या मजूर महिलांचा अपघात विमा काढला आहे किंवा नाई याबाबत माहिती मिळू शकली नाही.
Web Title: tempo carrying laborers overturned, killing two including a woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study