Home अहिल्यानगर अहिल्यानगर: टेम्पो बस अपघात, एसटी बस थेट घुसली शेतात, १५ प्रवासी जखमी

अहिल्यानगर: टेम्पो बस अपघात, एसटी बस थेट घुसली शेतात, १५ प्रवासी जखमी

Ahilyanagar ST Bus and Tempo Accident: टेम्पोने जोराची धडक दिल्याने एसटी बसमधील 15 प्रवासी जखमी.

Tempo bus accident, ST bus directly entered the field

अहिल्यानगर: अहिल्यानगरकडून पाथर्डीकडे जात असलेल्या एसटी बसला मेहेकरी फाट्याजवळील सदगुरु विद्यालयाजवळ समोरून येणार्‍या टेम्पोने जोराची धडक दिल्याने एसटी बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहे. हि घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी अहिल्यानगरकडून पाथर्डीकडे  मार्गस्थ झालेली राजगुरू डेपोची बस मेहेकरी फाट्या जवळील सद्गुरु विद्यालयाजवळ आल्यानंतर चालकाने समोर स्पीडबेकर असल्यामुळे गाडी कंट्रोल करत असतांना त्याचवेळी पाथर्डीकडून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो चालकाने स्पीड ब्रेकर पाहताच अचानक ब्रेक दाबल्यामुळे टेम्पो आडवा झाला. समोरून येणार्‍या बस चालकाने सावधानता बाळगत एसटी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात एसटी बस जवळच्या डाळिंबाच्या शेतात घुसली. या अपघातामध्ये एसटी बसमधील पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समजली आहे. तर टेम्पोचा चालकही जखमी झाला.

मात्र तो जखमी अवस्थेतच घटनास्थळावरून पसार झाल्याची चर्चा आहे. अपघाताची माहिती समजताच मेहेकरीचे सरपंच नंदकुमार पालवे, सुधीर वायकर, मंगेश पालवे, गुलाबराव बेरड, रवींद्र लांडगे यांच्यासह मेहेकरी, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी येथील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील जखमींना मदत केली. तसेच नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी देखील तात्काळ घटनास्थळी येऊन जखमींना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. तसेच अपघातस्थळी झालेली वाहतूक कोंडी देखील तात्काळ सुरळीत केली.

Web Title: Tempo bus accident, ST bus directly entered the field

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here