Home संगमनेर संगमनेर: तहसीलदारांना धमकी! एकावर गुन्हा दाखल

संगमनेर: तहसीलदारांना धमकी! एकावर गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner Crime: रेशनकार्ड त्वरित बनवून द्या, अन्यथा तुमच्याविरुद्ध खोट्या केसेस करेल, अशी धमकी देऊन एका तरुणाने तहसील कार्यालयात तहसीलदारासमोर गोंधळ घातल्याची घटना.

 Tehsildar threatened! A case has been registered against one

संगमनेर : रेशनकार्ड त्वरित बनवून द्या, अन्यथा तुमच्याविरुद्ध खोट्या केसेस करेल, अशी धमकी देऊन एका तरुणाने तहसील कार्यालयात तहसीलदारासमोर गोंधळ घातल्याची घटना घडली.

तहसीलदारांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तहसीलदार धीरज मांजरे हे दोन दिवसापूर्वी कार्यालयात काम करत होते. यावेळी प्रमोद सखाराम ढवळे (रा. काकडवाडी) हा तहसील कार्यालयात आला. त्याने आपले रेशन कार्डचे कामे आहे, ते मला तातडीने करून द्या, असे म्हणून आरडाओरड केली. समजावून सांगुनही त्याचा गोंधळ थांबला नाही. तहसीलदारांच्या फिर्यादीनुसार ढवळे विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Tehsildar threatened! A case has been registered against one

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here