संगमनेरचे तहसीलदार धिरज मांजरे यांनी पदभार स्वीकारला
Sangamner Tehsildar Dhiraj Manjre: प्रतिक्षेनंतर अखेर संगमनेरच्या तहसीलदारपदाचा कार्यभार धिरज मांजरे यांनी मंगळवारी स्वीकारला.
संगमनेर: येथील एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर संगमनेरच्या तहसीलदारपदाचा कार्यभार धिरज मांजरे यांनी मंगळवारी स्वीकारला. अवैध गौणखनिज, वाळू यासंदर्भात कोणाचीच गय केली जाणार नाही. भरारी पथकांच्या माध्यमातून कारवाया केल्या जातील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
यापूर्वी धिरज मांजरे हे वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे कार्यरत होते.साडेतीन वर्षांच्या तेथील कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत राज्य सरकारने त्यांना उत्कृष्ट तहसीलदाराचा पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यानंतर आता त्यांची संगमनेर येथे तहसीलदारपदी नियुक्ती झाली असून मंगळवारी सायंकाळी त्यांनी पदभारही स्वीकारला आहे. यावेळी निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
Web Title: Tehsildar Dhiraj Manjre of Sangamner assumed charge
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App