संगमनेर: विद्यार्थिनीची छेड काढणे पडले चांगलेच महागात
Sangamner News: विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्यास सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
संगमनेर: विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्यास सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी गुरुवारी (दि. ९) हा निकाल दिला.
मुद्दसर जाफर शेख असे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सात वर्षांपूर्वी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. विद्यार्थिनी महाविद्यालयात जात असताना शेख वेळोवेळी तिचा पाठलाग करायचा. त्याला समजावून सांगूनही तो ऐकत नव्हता. दुचाकीने पाठलाग करत त्याने विद्यार्थिनी जात पोलिसांनी असलेल्या दुचाकीला त्याची दुचाकी अडवी लावत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तिच्या घरासमोर तो आला विद्यार्थिनीच्या वडिलांनी त्याला विचारले त्यावेळी त्याने त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्यानंतर शेख विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
न्यायाधीश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. मच्छिंद्र गवते यांनी केलेला प्रबळ युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश मनाठकर यांनी शेख याला सहा महिन्यांचा सश्रम कारावास करत आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Web Title: Teasing the student was very expensive
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App