राहत्या घरी शिक्षकाची आत्महत्या, अखेरच्या पत्रात लिहलं असं काही की सगळेच हादरले…
महाड तालुक्यात वरंध इथे एका शिक्षकाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली. शिक्षकानी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून जीवन संपवण्याचं कारण सांगितलं.
रायगड : राज्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात घडली आहे. महाड तालुक्यात वरंध इथे एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली. संतोष ज्ञानेश्वर मेमाणे रा. वरंध तालुका महाड, मूळ रा. सासवड, जिल्हा पुणे असे या शिक्षकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, या शिक्षकाने वरंध येथील राहत्या घरामध्ये छताच्या फॅनला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्षकानी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून जीवन संपवण्याचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. मयत संतोष मेमाणे हे रायगड जिल्हा परिषद शाळा भावे चौधरीवाडी इथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.
या शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी कर्जाला कंटाळल्यामुळे एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शिक्षकाचा मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे इथे या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. गोरेगावकर हे करीत आहेत.
Web Title: teacher’s suicide at the residence, something written in the last letter that shocked everyone
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App