अहमदनगर: शिक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
Breaking News | Ahmednagar: गॅस टाकी चोरल्याची विनाकारण बदनामी केल्याच्या कारणावरून शिक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना.
राहुरी: गॅस टाकी चोरल्याची विनाकारण बदनामी केल्याच्या कारणावरून शिक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना राही तालुक्यातील तिळापूर येथे घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगडू भिका काकड (वय ४५) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दगडू काकड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संगमेश्वर वस्ती येथे शिक्षक म्हणून नोकरी करतात. ते तिळापूर गावात मोहटा देवी मंदिराच्या अलीकडे पुलावर थांबले असता आरोपी तेथे आला व म्हणाला की, माझ्या नावाने गावात गॅस टाकी चोरली
म्हणून विनाकारण का बोभाटा केला. असे म्हणून शिवीगाळ करू लागला. तेव्हा दगडू काकड त्याला म्हणाले, मी तुझे नाव घेतले नाही, तु शिवीगाळ करू नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने त्याने दगडू काकड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू माझ्या नादी लागलास तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
दगडू भिका काकड यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल अशोक पालवे (रा. वांजुळपोई, ता. राहुरी) याच्यावर गु.र.नं. ८९६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११७ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: teacher was beaten with kicks
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study