Home अहमदनगर अहमदनगर: मुलींच्या छेडछाडीबद्दल शिक्षकाला सक्तमजुरी

अहमदनगर: मुलींच्या छेडछाडीबद्दल शिक्षकाला सक्तमजुरी

Breaking News | Ahmednagar: मुलींची छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबद्दल प्राथमिक शिक्षकाला अहमदनगर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

Teacher fined for molesting girls

राहुरी : जिल्हा परिषद शाळेतील मुलींची छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबद्दल प्राथमिक शिक्षकाला अहमदनगर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मदन रंगनाथ दिवे (रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता, जि. नगर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. या निकालाने जिल्ह्यातील शिक्षक वर्गात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी, की पीडित मुली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होत्या. आरोपी मदन दिवे त्यांना शिक्षक म्हणून शिकविण्यास होता. त्याने पीडित मुलींची शाळेच्या वर्गामध्येच छेडछाड करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले होते. या घटनेची माहिती मुलींनी मुख्याध्यापिकेस लेखी दिली होती. त्यानंतर राहुरी पोलिस  ठाण्यात मदन दिवे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. हा खटला अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांच्यासमोर चालला. खटल्यात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून आरोपीला दोषी धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी पोस्को (बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२) कायद्यानुसार तीन वर्षे सक्तमजुरी व १५ हजारांच्या दंडाचीशिक्षा सुनावली.

दरम्यान, २५ डिसेंबर २०२२ रोजी घटना घडली होती. खटल्याचे कामकाज सुरू असताना आरोपी न्यायालयीन कोठडीतच होता. या खटल्यात फिर्यादी, पीडित दोन मुली, मुख्याध्यापिका, शिक्षक व तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. मंगेश व्ही. दिवाणे यांनी बाजू मांडली. त्यांना पोलिस हवालदार अविनाश दुधाडे, योगेश वाघ, सहाय्यक फौजदार विलास साठे, महिला पोलिस राणी बोर्डे यांनी सहकार्य केले.

Web Title: Teacher fined for molesting girls

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here