संगमनेर: शिक्षकाने केली शिक्षिकेला मारहाण
Breaking News | Sangamner Crime: शिक्षकाने शिक्षिकेला मारहाण केल्याची घटना.
संगमनेर : शिक्षकाने शिक्षिकेला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) सकाळी ८.२० वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका शाळेत घडली. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दत्तू किसन कौटे (रा. फ्लोरा टाऊन सोसायटी) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ५५ वर्षीय शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. कौटे आणि शिक्षिका हे दोघेही संगमनेर तालुक्यातील एका शिक्षण संस्थेच्या शाळेत सेवेत आहेत. शुक्रवारी सकाळी शिक्षिका शाळेतील स्टेजवर खुर्ची टाकून बसल्या होत्या. त्यावेळी कौटे हा तेथे आला, त्याने शिक्षिकेला चुकीच्या पद्धतीने बोलण्यास सुरुवात केली.
Web Title: Sangamner teacher beat the teacher