अहमदनगर ब्रेकिंग: तलाठ्याने चक्क फोन पे द्वारे स्वीकारली पाच हजाराची लाच
Ahmednagar Bribe Case: तक्रारदार यांनी सदर दस्त व सुची २ हे आरोपी लोकसेवक यांना देऊन खरेदी घेणारे व्यक्तीचे नावाची नोंद शासकीय अभिलेखात घेऊन फेरफार मिळणे कामी.
अहमदनगर: युनिट: अहमदनगर
तक्रारदार- पुरुष, वय- ३४ रा.खांडके, ता- नगर, जि.अ ‘ नगर
आरोपी रामेश्वर भागवत गोरे, तलाठी-वर्ग ३.नेमणुक – सजा खांडके, ता – नगर. रा- बोरुडे यांचे घरी भाड्याने, बायजाबाई कॉलनी, सावेडी, अहमदनगर
लाचेची मागणी: ५,०००
लाच स्विकारली: ५०००/₹ ( फोन पे द्वारे)
लाचेची मागणी ता.२४/०२/२०२३
लाच स्विकारली – ता. २४/०२/२०२३
लाचेचे कारण -.यातील तक्रारदार यांनी दिनांक २०/०२/२३ रोजी त्यांचे नावावरील ४८ गुंठे जमीन विकली होती. विक्री केलेनंतर सदर जमीनीची नोंद शासकीय अभिलेखात करुन देण्याची जबाबदारी तक्रारदार यांनी घेतली होती. दिनांक २१/०२/२३ रोजी तक्रारदार यांनी सदर दस्त व सुची २ हे आरोपी लोकसेवक यांना देऊन खरेदी घेणारे व्यक्तीचे नावाची नोंद शासकीय अभिलेखात घेऊन फेरफार मिळणे कामी विनंती केली होती. त्यावेळी आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचे कडे ₹ ५०००/- ची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांचेकडे आज रोजी तक्रार केली. सदर तक्रारीचे अनुषंगाने आज रोजी लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक याने पंचासमक्ष तक्रारदार यांचे कडे ₹ ५०००/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झालेवरुन आज रोजी सुरभी हॉस्पिटल चौकात लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांना लाचेची रक्कम फोन पे द्वारे त्याचे बॅक खाते वर टाकणेस सांगितले व ₹ ५०००/- त्याचे स्वत:चे खात्यावर आलेबाबत खात्री करून तेथुन निघुन गेला. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल वरुन आरोपी लोकसेवक यांचे मोबाईल वर फोन पे द्वारे पाठविलेले ₹ ५०००/- आरोपी लोकसेवक याचे खात्यावर वर्ग झाल्याची पंचासमक्ष खात्री करुन आरोपी लोकसेवक याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे. पोलीस ठाणे तोफखाना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
सापळा अधिकारी: हरिष खेडकर, पोलीस उपअधीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर.
सहायक सापळा अधिकारी: शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.अहमदनगर
सापळा पथक: पोलीस हवालदार संतोष शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, सचिन सुद्रुक, चालक पोलीस हवालदार हरुन शेख.
मार्गदर्शक: मा शर्मिष्ठा वालावलकर – घारगे मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मा.श्री नारायण न्हाहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक., मा.नरेंद्र पवार वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक.
आरोपीचे सक्षम अधिकारी: – मा. उपविभागीय अधिकारी,नगर- नेवासा,जि.अहमदनगर
Web Title: Talathi accepted a bribe of five thousand through phone pay
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App