वाल्मिक कराडचं नाव घेत, भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच केलं विष प्राशन
Navi Mumbai Crime News | Attempt to Suicide: नवी मुंबई जिल्ह्यातील एका माजी भाजप नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर.
मुंबई : नवी मुंबई जिल्ह्यातील एका माजी भाजप नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकाला पोलिस ठाण्यात विष प्राशन केले. भरत जाधव असे या नगरसेवकाचे नाव असून रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.
भरत जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आर्थिक फसवणूक झाल्याचे आरोप करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते विष पिताना दिसत आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला हे अद्याप समजू शकले नाही. . विष प्राशन केल्यानंतर भरत जाधव यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना नेमकी कशामळे घडली,याचा तपशील अद्याप समोर आला नाही.
आज मी प्रचंड मानसिक ताणतणावात आहे, कारण समाजामध्ये वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती समाजात इतकी प्रचलित झाली आहे की तुम्ही प्रामाणिकपणे काम करू शकणार नाही. मी माझा व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहे, पण त्यामध्ये मला त्रास झाला. आर्थिक फसवणूक, कामे बंद झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
Web Title: Taking the name of Valmik Karad, the former BJP corporator attempt to suicide