Home क्राईम संतापजनक! पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढत सोशल मीडियावर केला व्हायरल

संतापजनक! पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढत सोशल मीडियावर केला व्हायरल

Crime News : पती-पत्नीच्या वादातून पतीने धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. पत्नीचा अश्लील व्हिडिओ (obscene video)सोशल मीडियावर टाकत बदनामी केल्याचा प्रकार. 

Taking an obscene video of his wife went viral on social media

 डोंबिवली: पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे. या प्रकरणी पीडित पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेकडे एका उच्च सोसायटीमध्ये पीडित महिला आपल्या पतीसोबत राहत होती. जून 2020 साली या दोघांचं लग्न झालं होतं. गेल्या काही महिन्यांपासून या पती-पत्नीमध्ये वाद होत होते. यादरम्यान पीडित महिलेच्या पतीने तिचे अश्लील व्हिडिओ काढले तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

या संतापजनक घटनेचा जाब विचारला असता पीडित महिलेला पतीने मारहाण केली. आपला पती दुसरे लग्न करणार असल्याची माहिती पीडित महिलेला मिळाली तिने याबाबत विचारणा केली असता तिच्या पतीने व कुटुंबाने पीडित महिलेला शिवीगाळ करत धमकावले.

याप्रकरणी पीडीत महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Taking an obscene video of his wife went viral on social media

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here