राजूर: सर्वोदय विद्यालयात सर्वोदय अंक प्रकाशित करण्यात आला.
राजूर: गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर राजूर विद्यालयात गुरुवार दिनांक ४ जुलै रोजी सत्यनिकेतन संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. विवेकजी मदनसाहेब यांच्या हस्ते सर्वोदय हा अंक प्रकाशित करण्यात आला.
विद्यार्थ्याच्या विकासासाठी व त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने सन २०१९-२० या वर्षात सर्वोदय अंक प्रकाशित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे योगी केशवबाबा चौधरी वीरगाव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव मा. प्रा. टी. एन. कानवडे व सहसचिव श्री. मिलिंदजी उमराणी, तसेच संस्थेचे सदस्य एस. टी . एलमामे , विद्यालयाचे प्राचार्य श्री. मनोहर लेंडे, उप प्राचार्य श्री. पर्बत एल. पी. व सर्व शिक्षक आदी उपस्थित होते.
Website Title: SVM Rajur Sarvodaya magazine Published