राजूर: संविधान केवळ तत्वे नसून भारतीय महापुरुषांनी केलेली संघर्षमय वाटचाल: सचिव टी. एन. कानवडे
राजूर: गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ए. बी. पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी सत्यानिकेतन संस्थेचे सचिव तथा प्राचार्य टी. एन. कानवडे यांनी व्यासपीठावरून बोलताना स्वातंत्र्यदिनाच्या विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग यांना शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले की, स्वातंत्र्यदिन म्हणजे शिवाजींच्या स्वराज्याचे, आंबेडकरांच्या राज्यघटनेचे आणि गांधीजींचे इंग्रजांविरुद्ध संघर्ष होय. स्वराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, गणराज्य ही संविधानातील केवळ तत्वे नसून भारतीय महापुरुषांनी केलेली संघर्षमय वाटचाल आहे. त्या संघर्षांचा, विचारांचा जागर करण्यासाठी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतोय, अशा या महापुरुषांना ७३ व्या स्वातंत्र्यदिनी आदरांजली.
या कार्यक्रमाच्यावेळी सत्यानिकेतन संस्थेचे सहायक सचिव श्री. मिलींदशेठ उमराणी, संस्थेचे संचालक विलास पाबळकर, विजय पवार, मा.प्राचार्य बारेकर सर व सत्यानिकेतन संस्थेचे पदाधिकारी, डेरे साहेब तसेच विद्यालयाचे प्राचार्य लेंडे एम.डी. उपप्राचार्य श्री. पर्बत एल.पी, पर्यवेक्षक नरसाळे एस.ए, श्री. पाबळकर एस.एस. श्री. अजित गुंजाळ, सुराज्य न्यूजचे वार्ताहर नवनाथ परते आदी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते.
Website Title: SVM Rajur Independence day