अकोलेत आदिवासी तरुणाचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा नातेवाइकांचा आरोप
Breaking News | Akole: अकोले तालुक्यातील घोटी (कोहणे) येथील आदिवासी गावातील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता
अकोले : अकोले तालुक्यातील घोटी (कोहणे) येथील आदिवासी गावातील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करून या प्रकरणाची चौकशी होत नसल्याने घोटी येथे ग्रामस्थांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
अकोले तालुक्यातील घोटी येथील २४ वर्षीय दत्तात्रय कवटे हा सांगली जिल्ह्यातील तासगाव (योगेशवाडी) येथील पोल्ट्री व्यावसायिक सचिन साळुंके यांच्याकडे अनेक दिवसांपासून कामाला होता. १४ मार्च रोजी साळुंके यांनी दत्तात्रय साडीने गळफास लावून मृत झाला, असे कळविले. घटनास्थळी पोहोचल्यावर मृतदेह ताब्यात देण्यासाठी घाई केली. यानंतर मृतदेहाच्या हातावर व मानेवर धारदार शस्त्राने कापल्याच्या खुणा होत्या, असा नातेवाइकांचा आरोप आहे.
याप्रकरणी चौकशीसाठी गावात ग्रामसभा घेतली. त्याचे निवेदन पोलिस, मंत्रालय, जिल्हाधिकारी स्तरावर देण्यात आले. मात्र, तपास होत नसल्याने गावात उपोषण सुरू केले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण उपोषणाला बसले आहेत.
Breaking News: Suspicious death of tribal youth in Akole, relatives allege murder