पत्नीच्या चारित्र्यावर संशय पतीने कात्रीनं बायकोचा चिरला गळा
Breaking News | Pune Crime: एका व्यक्तीने कात्रीने वार करत आपल्या पत्नीचा गळा चिरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी आरोपी पत्नीवर कात्रीने वार करत होता, तेव्हा त्यांचा लहान मुलगा खुर्चीवर समोरच बसला होता.
पुणे : पुण्यातील खराडी परिसरात अमानुषतेचा कळस गाठणारी संतापजनक घटना घडली आहे. एका व्यक्तीने कात्रीने वार करत आपल्या पत्नीचा गळा चिरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी आरोपी पत्नीवर कात्रीने वार करत होता, तेव्हा त्यांचा लहान मुलगा खुर्चीवर समोरच बसला होता. हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा व्हिडीओ देखील काढला आहे. जवळपास साडेतीन मिनिटांचा व्हिडीओ काढत त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शिवदास तुकाराम गीते आरोपी पतीचं नाव आहे. तर ज्योती शिवदास गिते असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. आरोपी शिवदास गिते हा मुळचा बीडचा रहिवासी असून तो पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात टंकलेखक आहे. मागील काही दिवसांपासून त्याचा पत्नीसोबत कौटुंबीक वाद सुरू होता. तो सातत्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. यातून त्याने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा आरोपीनं पत्नीचा जीव घेतला, तेव्हा गिते दाम्पत्याचा तीन ते चार वर्षांचा मुलगा तिथेच खुर्चीवर बसला होता. सैतान झालेल्या पतीने मुलाच्या डोळ्यादेखत पत्नीचा शिलाई मशीनच्या कात्रीने गळा चिरून हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीनं जवळपास साडेतीन मिनिटांचा व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओत त्याने आपल्या पत्नीला मारायचं नव्हतं. पण नाईलास्तव मारावं लागलं, असं म्हटलं आहे.
शिवाय पत्नी आपली संपत्ती हडपेल, असा संशय देखील आरोपीला होता. यातून देखील हत्या केल्याची माहिती देखील समोर येत आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपीचा मागील काही दिवसांपासून पत्नीसोबत वाद सुरू होता. दोघांत कौटुंबीक कारणातून वाद होत होता. तसेच आरोपी पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. यातूनच शिलाई मशीनच्या कात्रीने आरोपीनं पत्नीचा गळा चिरला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Suspecting his wife’s character, the husband slit his wife’s throat
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News