सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…
Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe; पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कार्यकर्ते काम करतील असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले, सत्यजित तांबे यांच्या बाबत बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी.
नाशिक : सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याबद्दल लवकरच पक्ष भूमिका जाहीर करणार आहे. पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कार्यकर्ते काम करतील असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सत्यजित तांबे यांच्या बाबत बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी असे थेट आव्हान त्यांनी केले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची चुरस वाढत असून यातून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यावर विखे पाटील म्हणाले कि, त्यात सत्यजित तांबे आणि भाजपचे समीकरण काय याबद्दल अजूनही अधिकृत अशी स्पष्टता प्राप्त झाली नाही. त्यात आता भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल लवकरच पक्ष भूमिका जाहीर करणार आहे. पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कार्यकर्ते काम करतील असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सत्यजित तांबे यांच्याबाबत बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी असे थेट आव्हान त्यांनी केले आहे.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
विखे पाटील हे आज नाशिकमध्ये होते. नाशिकमध्ये आज पासून कृषी महोत्सवाला सुरुवात झाली असून या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी बोलत होते ते म्हणाले, की शेतीमाल विकावा लागतो, बाजार समिती साठवणूककडे लक्ष दिले पाहिजे, असे सल्ला त्यांनी यावेळी दिला. पण व्यवस्था सक्षम झाली नाही, हे दुर्दैव आहे. कृषी पणन यांची सांगड घातली पाहिजे. दोन्ही खाते दोन वेगवेगळ्या लोकांकडे असतात असे त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे राज्यामध्ये साखर कारखानाचे कर्ज होते. त्यांना कालच्या केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि राज्य सरकारच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या भेटीने दिलासा मिळेल. धोरणात बदल होतील. तसेच खुल्या बाजार पेठेत साखर विकता येईल. साखर कारखाना बरोबर प्राथमिक सोसायटीचे काम होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या गौण खनिजाबाबत ते म्हणाले कि, गौण खनिज बाबत पुढील आठवड्यात धोरण घेतले जाईल, असे ते म्हणाले.
अहमदनगर न्यूज़ फॉलो गुगल न्यूज़
Web Title: support Satyajeet Tambe or not, said Radhakrishna Vikhe Patil
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App