संगमनेरात शार्ट सर्किटमुळे सुपर शॉपीला आग, आगीत लाखोंचे नुकसान
Sangamner Fire: सुरभी सुपर शॉपीला शार्ट सर्किटमुळे भीषण आग, आगीत सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याची शक्यता.
संगमनेर: संगमनरे शहरातील नवीन अकोले रोडवरील सावतामाळी नगर येथील सुरभी सुपर शॉपीला शार्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. सोमवारी पहाटे ही आग लागली. या आगीत आगीत सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. आतील किराणा मालासह फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे अनेक वेळा सर्वसामान्यां सह व्यावसायीक व उद्योजकांना मोठे अर्थिक नुकसान व मनस्थाप सहन करावा लागतो.
सावतामाळी नगर परिसरातील व्यावसायिकांचे नुकसान होणे सततचे झाले आहे. दरम्यान येथील सावतामाळी नगर येथे राजू अभंग व भाऊसाहेब गलांडे बाचे सुरभी सुपर शॉपी हे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात आज सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शार्ट सर्किटमुळे आग लागली. बीज बोला लागलेली ही आग हळूहळू भडकू लागली, दुकानाचा पत्रा जळून ही आग आत मध्ये गेली आणि दुकानातील वस्तूंनी पेट घ्यायला सुरुवात केली. आत प्लॅस्टिक च्या गोण्या, तेलाचे डबे व प्लास्टिक पेकिंगच्या अनेक वस्तू असल्याने या संपूर्ण दुकानाला मोठा धोका निर्माण झाला होता. परंतु शेजारीच रहात असलेल्या माजी नगरसेवक गजेंद्र अभंग यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी शेजारीच राहणारे दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे यांना आवाज देत बाहेर बोलावले व तात्काळ अग्रिशमन दलाला माहिती दिली. अग्रिशमन दलाच्या पथकाने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेत या आगीवर पाण्याचा जोरदार मारा करत नियंत्रण मिळवले.
Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा
सदर सुपर शॉपीत मोठ्या प्रमाणावर किराणा माल व फर्निचर असल्याने या आगीची मोठी झळ दुकानाला बसली आणि यात सुमारे ४० ते ४५ लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग पहाटे लागल्याने व वेळीच लक्षात आल्याने ती अटोक्यात आणता आली मात्र मध्यरात्री जर ही दुर्घटना घडली असती तर आणखी मोठी हानी झाली असती.
Web Title: Super shop caught fire due to short circuit in Sangamner
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App