Home अहिल्यानगर सुजय विखे पाटील म्हणतात, “ लोकांनी नाकारलेला फुसका बॉम्ब” निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी….

सुजय विखे पाटील म्हणतात, “ लोकांनी नाकारलेला फुसका बॉम्ब” निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी….

Breaking News | Rahata | Maharashtra election controversy : राहुल गांधी यांची नेतृत्व गेली 20 वर्षांपासून, 10 वर्षांपासून, तर आता देखील लोकांनी नाकारलं आहे.

Sujay Vikhe Patil says, A bombshell rejected by the people before facing the elections1

राहता: काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीच्या मुद्यावरून भाजप आणि निवडणूक आयोग चांगलेच अडचणीत सापडले आहे.

निवडणूक आयोगाने या मत चोरीच्या आरोपांच्या चौकशीसाठी राहुल गांधी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र देत, सही करून मागितले आहे किंवा आरोप चुकीचे असल्याचे मान्य करत, माफी मागावी असं सुनावलं आहे. या सर्व वादावर देशभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

सुजय विखे पाटील राहाता दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विखे पाटील यांनी राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या मुद्याला ‘फुसका बॉम्ब’ म्हटलं आहे. तसंच राहुल गांधी यांची नेतृत्व गेली 20 वर्षांपासून, 10 वर्षांपासून, तर आता देखील लोकांनी नाकारलं आहे, असा टोला लगावला.

सुजय विखे पाटील म्हणाले, “कोणत्याही आमदाराला निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मतदार याद्या उपलब्ध असतात. ही प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी मतदार याद्या पब्लिश केल्या जातात, त्यावर हरकती मागवल्या जातात, त्या हरकतींची छाननी झाल्यानंतरच मतदार याद्या अंतिम होते”. राहुल गांधींना जेवढ्या भागामध्ये आक्षेप आहे, तिथल्या आमदारांनी आक्षेप का घेतला नाही? असा सवाल विखे पाटलांनी केला.

‘निवडणूक आयोगाविरोधात वाद निर्माण करताना, तुम्ही न्यायालयात जाऊ शकतात, तिथं निवडणूक आयोगाविरुद्ध भांडू शकता, निवडणूक आयोगाने जेव्हा प्रतिज्ञापत्र सही करून मागितल्यास तेव्हा ते मागे सरकले. ते सही करणार नाहीत. हा एक ‘फुसका बॉम्ब’ आहे. यांना लोकांनी नाकारलेला आहे’, असा टोला सुजय विखे पाटलांनी लगावला.

‘राहता विधानसभा मतदारसंघांमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना 65 हजारांचं मताधिक्य आहे. 1 लाख 30 हजार मते मंत्री विखे पाटील यांना पडली आहेत. 65 हजारांची मताधिक्य आहे, त्यात बोगस किती आहे, आपण समजू 5 हजार मतदान बोगस आहे, ते वजा करा, राहतात 60 हजार. हे फक्त आरोप-प्रत्यारोप आहे. जनतेने काँग्रेस आणि महाविकास आघाडीला पूर्णपणे नाकारले आहे. हे फक्त त्यांचे नैराश्य आहे’, असेही सुजय विखे पाटील यांनी म्हटले.

Breaking News: Sujay Vikhe Patil says, “A bombshell rejected by the people” before facing the elections

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here