Home औरंगाबाद Suicide: तरुणाने व्हिडीओ कॉल करून घेतला गळफास

Suicide: तरुणाने व्हिडीओ कॉल करून घेतला गळफास

Aurangabad Suicide News: २९ वर्षीय रिक्षाचालकाने मावसभावाला व्हिडीओ कॉल करत गळफास, व्हिडीओ कॉल करून आत्महत्या.

Suicide youth made a video call and hanged himself

औरंगाबाद: शाहूनगरातील २९ वर्षीय रिक्षाचालकाने मावसभावाला व्हिडीओ कॉल करत गळफास घेतला. ही घटना शनिवारी घडली. अमोल उत्तम खाडे (रा. मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

अमोलचे साडेतीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पत्नी सहा महिन्यांपासून माहेरी आहे. त्याने शनिवारी सायंकाळी मावसभावाला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. किचन ओट्याजवळ उभा राहून तो बोलत होता. नायलॉनच्या दोरीचा फास त्याने गळ्यात घातल्याचे व्हिडिओ कॉलमध्ये रेकॉर्ड झाले आहे. अमोलला भावाने समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत अमोलने गळफास घेतला.

Web Title: Suicide youth made a video call and hanged himself

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here