कॉलेजच्या इमारतीवरुन विद्यार्थिनीची उडी, 21 वर्षाच्या तरुणीने संपवलं जीवन
Breaking News | Mumbai Suicide: एका महाविद्यालयात तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.
मुंबई : मुंबईतील एका महाविद्यालयात तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी या मुलीने महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ही मुलगी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली. तिने आत्महत्या केली किंवा ती पडली, याबाबत अद्याप थोडासा संभ्रम आहे. महाविद्यालय प्रशासनाने तिच्या कुटुंबीयांना ती तिसऱ्या मजल्यावरुन पडली आणि तिचा मृत्यू झाला, असे सांगितले. त्या तरुणीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास अधिक तपास पोलीस करीत आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये ती तरुणी कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे. ती तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
महाविद्यालयाने तिच्या कुटुंबीयांनी ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याचे सांगितले. तिने आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक शक्यता आहे. मात्र, कुटुंबीयांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Breaking News: Suicide Student jumps from college building, 21-year-old ends life