धक्कादायक! अहिल्यानगर जिल्ह्यात तीन तरुणांच्या आत्महत्या
Breaking News | Ahilyanagar Suicide: अहिल्यानगर जिल्ह्यात तीन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
बेलापुरात एकाची आत्महत्या
बेलापूर : बेलापूर परिसरातील चाँदनगर येथील एका तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी घडली. तुषार केदारनाथ शिंदे (वय: २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तुषार याने का आत्महत्या केली? याचे कारण स्पष्ट नसले तरी ऑनलाइन गेममध्ये आर्थिक नुकसान झाल्याची परिसरात चर्चा आहे. दरम्यान या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मत्यची नोंद करण्यात आली आहे.
चिंचाळे येथे घरात गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या
राहुरी: राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथील एका तरुणाने काल दि. ११ जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान त्याच्या राहत्या घरातील छताच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. भाऊसाहेब शिवाजी गावडे (वय ३८) हा विवाहित तरुण राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथील ठाकरवाडी येथे राहत होता. दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजे दरम्यान भाऊसाहेब गावडे याचा एक नातेवाईक त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. त्यावेळी भाऊसाहेब गावडे हा घरातील छताच्या अँगलला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. नातेवाईकाने आरडाओरडा केला असता परिसरात काहीजण जमा झाले. त्यांनी भाऊसाहेब गावडे याला खाली उतरवून रविंद्र देवगीरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन तोडमल यांनी भाऊसाहेब गावडे यास तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. भाऊसाहेब गावडे याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट नसून या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या
कोपरगाव : तालुक्यातील मुर्शतपूर, गांजेवाडी येथील प्रतिक दत्तात्रय गोसावी (वय २६) या तरूणाने राहत्या घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागे कारण अद्याप समजलेले आहे. नाही. सदरची घटना काल शनिवारी दुपारी दोन वाजता घडली. पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबा कोरेकर, तुषार कानवडे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
Web Title: Suicide of three youths in Ahilyanagar
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News