Suicide: स्टेट बँकेच्या मॅनेजरची आत्महत्या
Suicide News: बेडरूममध्ये झोक्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या.
जवळा बाजार | हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. हट्टा पोलिसात मृत्यूची नोंद झाली आहे.
शाखा व्यवस्थापक प्रकाश यादवराव सरकटे (वय ४५) यांनी किरायाने राहत असलेल्या घरी आत्महत्या केली. जवळाबाजार येथील भारतीय स्टेट बँक शाखेत व्यवस्थापक पदावर ते कार्यरत होते. प्रकाश सरकटे यांनी तणावात येऊन मध्यरात्री बेडरूममध्ये झोक्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Web Title: Suicide of State Bank Manager
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App