धक्कादायक घटना: एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
पुण्यातील मुंढवा भागातील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रहिवाशांची चौकशी सुरु.
पुणे : मुंढवा भागातील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली. परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजितकुमार लकडे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून परिसरातील रहिवाशांची चौकशी करण्यात येत आहे.
मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश. या कुटुंबाने आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
शेजारी राहणाऱ्या लोकांच्या संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहतीनुसार, दिपक थोटे (वय- 59) इंदू दिपक थोटे ( वय- 45) मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (वय- 24) मुलगी समीक्षा दिपक थोटे (वय-17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. मूळचे अमरावती येथील असलेले थोटे कुटुंबीय दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर भागात वास्तव्यास आले होते.
डॉ. दौलत पोटे यांना हे कुटुंबीय राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा बंदच असल्याने संशय आला. यानंतर त्यांनी केशवनगर पोलीस ठाण्यास कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा जोरजोरात आदळून उघडला असता हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी चौघांचे मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीकरिता ससून रुग्णालयात पाठविले आहेत. आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.
Web Title: Suicide of four in the same family
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App