Sangamner: संगमनेर शहरात तरुणाची आत्महत्या
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरात माधव टाकीज परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यामागील कारण अद्याप समजू शकले नाही.
अक्षय मंगेश जाधव वय २८ रा. माधव टाकीज जवळ संगमनेर असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने स्वामी समर्थ मंदिराच्या मागे एका झाडाला रुमाली कापडाने गळफास घेतल्याचे दिसून आले. या तरुणाने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांत खबर देण्यात आली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Suicide of youth in Sangamner city