Home महाराष्ट्र एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीची आत्महत्या

एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीची आत्महत्या

Breaking News | Satara Suicide: एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीनं आत्महत्या केल्याची घटना.

Suicide of a young woman studying MBBS

सातारा : एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या तरूणीनं आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. योगेश्वरी निटुरे (मूळ रा. परभणी), असं मृत तरूणीचं नाव असून ती वैद्यकीय शिक्षणासाठी मलकापूर (ता. कराड) शहरातील आगाशिवनगरमध्ये वास्तव्यास होती. दरम्यान, इमारतीवरून पडल्यानं तिचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. मात्र, तिने आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

योगेश्वरी ही वैद्यकीय शिक्षणानिमित्त मलकापूरच्या आगाशिवनगर भागातील एका इमारतीत राहत होती. तीचे आई-वडील डॉक्टर असून तिच्या सोबत तिची आई राहत होती. रविवारी सकाळी (२९ जून) इमारतीवरून पडून गंभीर जखमी झाल्यानं तिला कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी दुपारी तिचा मृत्यू झाला होता.

सुरूवातीला अकस्मात मृत्यू, अशी नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली होती. तसंच अपघात की आत्महत्या, याबद्दल पोलिसांकडूनही माहिती मिळत नव्हती. दरम्यान, संबंधित इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तरूणीनं उडी मारून आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तारू यांनी दिली. आत्महत्येमागील कारण समजू शकलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. या घटनेमुळं मृत तरूणीच्या आई-वडिलांना मानसिक धक्का बसला आहे.

प्रेमप्रकरणातून प्रियकराने इमारतीवरून ढकलून प्रेयसीची हत्या करत संशयितानं आत्महत्येचा बनाव केल्याची घटना वर्षभरापूर्वी (३० जुलै २०२४) मलकापुरातच घडली होती. प्रेयसी आणि प्रियकर दोघेही एकत्र वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्या प्रकरणात ध्रुव छिक्कारा (रा. हरियाणा) याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती.

Breaking News: Suicide of a young woman studying MBBS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here