Home महाराष्ट्र नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, कारण आलं समोर

नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, कारण आलं समोर

Breaking News | Nagpur Suicide: नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या एका 17 वर्षीय तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना.

Suicide of a young woman preparing for NEET exam

नागपूर : नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या एका 17 वर्षीय तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना नागपूर शहरातील हिंगणा परिसरातील घटना वानाडोंगरी इथल्या मंगलमूर्ती कॉलनीत घडली आहे. वैदेही अनिल उईके असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. वैदेहीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नीट परीक्षेत स्कोअर कमी आल्यानं होती तणावात : वैदेही उईकेचे वडील अनिल उईके नागपूर शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. तर मोठी बहीण एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे. वैदेहीनं यावर्षी ‘नीट’ची परीक्षा दिली होती, परंतु तिला स्कोर कमी आला. त्यामुळे ती पुन्हा परीक्षेच्या तयारीसाठी एका ट्युशन अकॅडमीत शिक्षण घेत होती. ती नेहमी प्रमाणं ट्युशनला गेली मात्र परतल्यानंतर वैदेहीनं घरात आत्महत्या केली.

वैदेहीनं आत्महत्या केली त्यावेळी तिचे आईवडील वैयक्तिक कामानिमित्त बाहेर गेलेले होते. ज्यावेळी ते घरी आले, त्यावेळी वैदेहीची तब्येत त्यांना बरी दिसली नाही. तिच्या आई वडिलांनी तिला तत्काळ नजीकच्या शालिनीताई मेघे रुग्णालयात उपचारासाठी नेलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वैदेहीची तब्येत मानसिक तणावात असल्यानं बिघडली असल्याचं सांगितलं. वैदेहीवर प्राथमिक उपचार घेऊन ती आई-वडिलांसह ती घरी परतली.

वैदेहीनं कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये जात असल्याचं आईला सांगून ती आत गेली. बराच वेळ बेडरूममधून बाहेर आलीच नाही. त्यावेळी वडिलांनी भाडेकरुंना बोलावून बेडरूमचं दार तोडून आत प्रवेश केला. वैदेही त्यांना पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली. तिला खाली उतरवलं असता, ती मृत झाल्याचं दिसून आलं. याची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महेश पवार आणि पथकानं पंचनामा केल्यानंतर वैदेहीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून तपास सुरू केला आहे. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Breaking News: Suicide of a young woman preparing for NEET exam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here