Home अहिल्यानगर तरुणी विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, चौघांना अटक

तरुणी विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, चौघांना अटक

Suicide of a young married woman by jumping into a well crime filed

कोपरगाव | Crime: कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे एका २४ वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आला. पूजा सागर मापारी असे मयत विवाहितेचे नाव आहे.

सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या २४ वर्षीय विवाहितेचा फर्निचर दुकानासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास भाग पडल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांना अटक केली आहे.

पूजा हिचे वडील विजय बाळकृष्ण भुजाडे रा. गोधेगाव यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सागर भीमराज मापारी, भीमराज मापारी, संगीता मापारी व विशाल मापारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्यावर पुजाला त्रास देणे सुरु झाले. तिने कंटाळून विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Suicide of a young married woman by jumping into a well crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here