Home औरंगाबाद सहा महिन्याच्या चिमुकल्यासह डॉक्टर महिलेची आत्महत्या

सहा महिन्याच्या चिमुकल्यासह डॉक्टर महिलेची आत्महत्या

Breaking News | Suicide: सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाटेगावच्या पुलावरून गोदावरी नदीच्या वाहत्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या.

Suicide of a woman doctor with a six-month-old baby

पैठण: पैठण शहरातील एका महिला डॉक्टरने  आपल्या सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाटेगावच्या पुलावरून गोदावरी नदीच्या वाहत्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवारी (1 ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू करून रात्री नऊ वाजेच्या सुमारास मृतदेह पाण्या बाहेर काढला. मात्र चिमुकल्याचा मृतदेह न सापडल्याने त्याचा शोध सुरू होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी सात वाजता शहरातील डॉक्टर प्रभाकर होरकटे यांच्या पत्नी डॉक्टर पुजा प्रभाकर होरकटे (रा. चांगतपूरी ता. पैठण, ह.मु. नवीन कावसन, पैठण) या गावाकडे जायचे म्हणून एका रिक्षात बसून आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह निघाल्या होत्या. रिक्षा पैठण- शेवगाव रस्त्यावर पाटेगाव पुलावर आल्यावर रिक्षा थांबवित रिक्षातून उतरून डॉक्टर महिलेने मुलासह पाण्यात उडी मारली. यावेळी महिला नदीतील प्रवाहीत पाण्यात वाहत गेल्याचे लोकांनी पाहिले. याबाबत त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना घटनेची माहिती दिली. निरीक्षक देशमुख यांनी पोलीस अंमलदार संजय मदने, सुधीर ओव्हळ, कल्याण ढाकणे, नरेंद्र अंधारे तसेच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक यांच्यासह पाटेगाव पुलाकडे धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली.

See also: Learn English

रात्रीची वेळ असल्याने अंधारात शोध मोहीमेत अडथळा येत होता. जनरेटर आणून मोठा उजेड करीत पात्रात पोलिसांनी स्थानिक माझी नगरसेवक बजरंग लिबोरे यांच्या मदतीने स्थानिक 15 ते 20 मच्छीमार व परिसरातील नागरिकांनी मदत कार्य सुरू केले. दोन तास ऑपरेशन राबविण्यात आले.त्यानतंर रात्री नऊ वाजेच्या दरम्यान डॉक्टर महिलेचा मृतदेह सापडला मात्र चिमुकल्याचा मृतदेह हाती लागला नसल्याने त्याचा शोध सुरूच होता. पोलिसांनी महिलेचा मृतदेह सरकारी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. डॉक्टर महिलेने पाण्यात उडी का मारली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

Web Title: Suicide of a woman doctor with a six-month-old baby

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here