धक्कादायक! एमबीबीएसच्या प्रथम वर्षात, उद्याच होती परीक्षा, विद्यार्थिनीने वसतीगृहात केली आत्महत्या
MBBS Student Suicide: एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.
लातूर : एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातून समोर आली आहे. साक्षी गायकवाड असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
शिक्षणाचा पॅटर्न म्हणून लातूरकडे पाहिले जात असल्याने राज्यभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरमध्ये येतात. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी लातुरात वास्तव्यास आहेत. औरंगाबाद येथील साक्षी गायकवाड ही विद्यार्थीनीसुद्धा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लातूर येथील स्वर्गीय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती.
एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची उद्या परीक्षा आहे. त्यामुळे आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास साक्षीच्या अन्य दोन रूममेंट अभ्यासासाठी ग्रंथालयात गेल्या होत्या. दरम्यान, सकाळी साक्षी गायकवाड या विद्यार्थिनीने वसतीगृहातील खोलीमध्ये छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना थोड्या वेळाने १० च्या सुमारास स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी याची माहिती स्वच्छता इन्स्पेक्टर तेलगावकर यांना दिली.
विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तेलगावकर यांनी ही घटना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकक्षक डॉ. समीर जोशी यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गांधी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.
साक्षीने आत्महत्या का केली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. साक्षी ही हुशार विद्यार्थीनी होती त्यामुळे तिच्या आत्महत्येमुळे तिच्या मैत्रिणींनाही धक्का बसला आहे.
Web Title: the suicide of a student studying in the first year of MBBS
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App