११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या, छोट्या भावाने खिडकीत डोकावले अन…
Breaking News | Suicide Case: १६ वर्षीय तरूणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना.
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी भागातील राजीव गांधीनगर येथील १६ वर्षीय तरूणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास समोर आली. गळफास घेत आत्महत्या केलेल्या मृत विद्यार्थीनीचे नाव त्रिपुरा जगन औटे ( वय १६, रा. राजीव गांधीनगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहीतीनुसार, मयत त्रिपुरा ही इयत्ता ११ वीत शिक्षण घेते. वडील कंपनी कामगार व आईचा ब्युटी पार्लर चालवते. शुक्रवारी ती नेहमीप्रमाणे ट्युशनला गेली होती. दुपारी एक वाजेच्या सुमारास ट्युशन आटोपून ती घरी परतली. दुपारी घरी कोणीच नसल्याने त्रिपराने तिच्या बेडरूमध्ये जात गळफास घेतला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याने नातेवाईक व शेजाऱ्यांनी तिला तात्काळ लटकलेल्या अवस्थेतून खाली उतरवले. घाटीत दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्रिपुराला तपासून मृत घोषित केले. त्रिपुराच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या घटनेप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार धारबळे करत आहेत. दरम्यान त्रिपुराचा छोटा भाऊ हा सायंकाळी पंतग खेळत होता. त्याने बेडरूमच्या खिडकीत डोकावले असता, त्याला त्याची ताई लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.
Web Title: Suicide of a student studying in class 11
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study